#नागपूर विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे वर्मा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ जून २०२१

#नागपूर विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे वर्मा

 


Nagpur khabarbat 

#नागपूर  विभागीय आयुक्तपदी मराठी भाषा विभागाच्या सचिव #प्राजक्ता_ लवंगारे वर्मा यांची नागपुरच्या ३२ व्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता वर्मा या २००१ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. २००१ साली upsc मध्ये यश मिळवलेल्या मॅडमना मुलाखतीत ३०० पैकी २६८ गुण मिळाले होते. 

प्राजक्ता लवंगारे राज्याच्या  प्रशासनात कार्यतत्पर, सेवानिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून नाव नेहमी आदराने घेतले जाते.  एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करीत टाटा सामाजिक संस्थेतून उच्च शिक्षण घेतले . 

वडील मुंबई महानगर पालिकेत कर्मचारी आणि आई एका खाजगी रुग्णालयात नर्स अश्या सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या मॅडमनी शिक्षण हीच आपल्या प्रगतीची गुरुकिल्ली समजून काम केले.  तीन बहिणी आणि तिनीही बहिणींनी केवळ उच्च शिक्षण संपादन केले नाही तर आपल्या क्षेत्रात उच्च प्रगती केली आहे . 

मॅडमनी सेवेत आल्यापासून वैजापूर , अहमदनगर,  धुळे मुंबई , नवी दिल्ली ,  सिडको नवी मुंबई येथे आपल्या कार्यातून वेगळेपणा जपला आहे.  उत्पादन शुल्क विभागात राज्याच्या आयुक्त म्हणून एक आदर्श उभा केला होता