दक्षिण - पश्चिम विधानसभा क्षेत्र नागपूर येथील अनेक युवकांनी केला मनसेत प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जून २०२१

दक्षिण - पश्चिम विधानसभा क्षेत्र नागपूर येथील अनेक युवकांनी केला मनसेत प्रवेश२४ जून २०२१.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन आज अनेक शिक्षित तरुणांनी प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत प्रवेश घेतला.

शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी प्रवेश घेणाऱ्या सर्व युवकांचे पुष्पगुच्छ आणि पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केले.

सोमलवाडा, गजानन नगर, पावन भूमी, पर्यावरणनगर, सोनेगाव तलाव, गोपालनगर या परिसरात राहणाऱ्या या युवकांनी यावेळी मनसेचे प्राथमिक सभासदत्व स्वीकारले.

आपल्या परिसरात,विभागात पक्षाची शाखा स्थापन करून प्रामाणिकपणे जनतेची कामे करा.. मनसे तुमच्या पाठीशी आहे असे सांगून सर्व नवीन सभासदांना अजय ढोके यांचेसह उपस्थित मनसे पदाधिकारी श्री अमित सायरे, महेशसिंह गहिरवार, आशिष रामटेके, यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रवेश घेणाऱ्या युवकांमध्ये प्रामुख्याने दर्शन पालकवार, ऋषिकेश पालकवार ज्ञानेश भगत, सागर गुप्ता, अमन देवगडे, अमित राठोड, वरुण बढिये, कृष्णा वसाटे, बादल सलामे, अनुराग साहू, उमेश काळे यांचेसह अन्य युवकांचा समावेश होता.