मनसेतर्फे महिला सफाई कामगारांचा सत्कार आणि भेट स्वरूप केले साडी वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ जून २०२१

मनसेतर्फे महिला सफाई कामगारांचा सत्कार आणि भेट स्वरूप केले साडी वाटप
आज दिनांक ८ जून रोजी आदरणीय सौ. शर्मिला (वहिनी) राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील सोनेगाव परिसरातील स्वागत सोसायटी येथे मनसेच्या वतीने भल्या पहाटे उठून वार्डाची स्वच्छता ठेवणाऱ्या  महिला सफाई कामगारांना साडी तर या सफाई कामगारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जमादार बंधूंना शर्ट व पॅन्ट पीस भेट स्वरूप म्हणून देण्यात आली. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते  हे वाटप करण्यात  आले.

कोरोनाच्या लाटेत सुध्दा हे कर्मचारी सातत्याने आपली सेवा जनतेला देत राहिले,आपले कर्तव्य रोज प्रामाणिकपणे पार पाडून नागपूरला स्वच्छ ठेवण्यात आपला मोलाचा वाटा आहे असे म्हणत उपस्थित महिला कर्मचारी व जमादार बंधूंचे मनसे पदाधिकारी यांनी आभार मानले.

यावेळी शहर अध्यक्ष अजय ढोके,कामगार सेनेचे उपचिटणीस  गणेश मुदलियार,निलेश मेट्टीवार,राजू चौहान व अन्य उपस्थित होते.    याप्रसंगी उपस्थित सर्व स्वच्छ्ता दुत आणि नागरिक यांना मिठाई व फराळ वितरित करण्यात आला.