आदिवासी समाजबांधवानी महापौरांचा केला सत्कार; मानले आभार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ जून २०२१

आदिवासी समाजबांधवानी महापौरांचा केला सत्कार; मानले आभार

क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा महानगर प्रशासनाने हलविला होता. तेव्हा आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे या बाबीची गंभीर दखल घेत महापौर सौ. राखिताई कांचर्लरलावार स्थायी समिती सभापती, श्री. रवी आसवांनी, गटनेते श्री. संदीप आवारी यांनी दखल घेतली व चंद्रपूर महानगरपालिका च्या 23/6/2021 रोजी झालेल्या सभेत पुतळा बसविणे, जागेचे सोंदर्यकरण व देखभाल या करिता जागा महानगरपालिकेस हस्तांतरण करण्याचा ठराव तात्काळ मंजूर केल्यामुळे चंद्रपूर भाजपा आदिवासी आघाडी तथा महानगरपालिका चे सर्व नगरसेविका यांच्या वतीने महापौरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता रेल्वेस्थानक परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शासकीय जागा विनामुल्य महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन देण्याबाबत माजी मंत्री, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले. जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांच्या वेळोवेळी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचित केले होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सकारात्मक पुढाकार घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या दिनांक २३/०६/२०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे ठराव क्र. ०९ अन्वये शासकीय जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्याचा ठराव पारित केला.

तेव्हा महानगर आदिवासी आघाडी अध्यक्ष धनराज कोवे, महिला व बालकल्याण सभापती सौ. चंद्रकलाताई सोयाम, नगरसेविका शीतल कुलमेथे, सौ. मायताई उईके, सौ. शितलताई आत्राम,ज्योतीताई गेडाम, महामंत्री यशवंत शिडाम, यांची उपस्थिती होती.