१८ केंद्रावर होणार ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ जून २०२१

१८ केंद्रावर होणार ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

 चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या आरोग्य विभागच्या वतीने ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सोमवार, दि. ७ जून २०२१ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत सुरु राहणार आहे. 



४५ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड) १. शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड, २. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर,  ३. पोद्दार स्कूल, अष्टभुजा वॉर्ड, ४. गजानन मंदिर, वडगांव, ५. शकुंतला लॉन १, नागपूर रोड, ६. टागोर प्राथमिक शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, 

७. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड, ८. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वॉर्ड, ९. सावित्रीबाई फुले शाळा, नेताजी चौक, १०. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ, ११. मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ, १२. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली मंदिर रोड, १३. लोकमान्य टिळक शाळा, समाधी वॉर्ड, १४. मातोश्री शाळा, तुकुम,  १५. विद्या विहार शाळा, लॉ कॉलेज जवळ


कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस घेणाऱ्यासाठी १. एरिया हॉस्पिटल, लालपेठ, २. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर, ३. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका, नागपूर रोड येथे केंद्र नियोजित करण्यात आले आहे.   संपूर्ण लसीकरण ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा. दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील. विनाकारण गर्दी करू नये. 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही, अशी माहिती मनपाने दिली आहे. 



18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ दुसरा डोस सुरु राहणार आहे. 

सोमवार, दि. ७ जून 2021 रोजी लसीकरण केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत  सुरू राहतील. 

1. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलच्या समोर (Covaxin)

सूचना - केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येईल.