जयताळा, बुद्ध विहार येथील परिसरात पिंपळासह विविध वृक्षांचे रोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ जून २०२१

जयताळा, बुद्ध विहार येथील परिसरात पिंपळासह विविध वृक्षांचे रोपणkhabarbat

khabarbat | MNS | BrithDay

मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचे पक्ष संघटन सहकारी तसेच वरिष्ठ मनसे नेते श्री बाळा नांदगावकर साहेब यांचा वाढदिवस आज अनेक समाज उपयोगी कार्यक्रमासोबत साजरा करण्यात आला.  या शृंखलेत नागपुरातील जयताळा, बुद्ध विहार येथील परिसरात पिंपळासह विविध वृक्षांचे रोपण मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षांचे संवर्धन करा.. हिच काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री हेमंत गडकरी यांनी याप्रसंगी आवर्जून केले. गुलमोहर, करंज, आंबा, सीताफळ इत्यादी  वृक्षांचे रोपण यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विभाग संघटक सागर नान्हे, विभाग उपाध्यक्ष अनिकेत दहीकर यांनी केले.

याप्रसंगी श्री हेमंत गडकरी यांच्यासह शहर अध्यक्ष अजय ढोके, शहर उपसंघटक राहुल अलोने, प्रणय कुर्वे,    रोजगार विभाग संघटक अक्षय दहीकर, प्रभाग अध्यक्ष प्रज्वल दुबे, हर्षल  गुडधे ,निलेश कोकाटे , स्वप्निल मेश्राम, शुभम बागडे, अतुल राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.