२४ जून २०२१
Home
उस्मानाबाद
महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते जोडा – ना. जयंत पाटील Jayant Patil
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते जोडा – ना. जयंत पाटील Jayant Patil
तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा घेतला आढावा
उस्मानाबाद /:प्रतिनिधीं
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केले. आज राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची उस्मानाबाद इथून सुरूवात झाली. यावेळी तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना ते बोलत होते.
पक्ष संघटना बळकट हवी. बुथ कमिटी सक्षम केली तर येणार्या जिल्हा परिषद निवडणुकीला ताकदीने सामोरे जाता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे कमी पडले याची माहिती जाणून घेतानाच आता येणाऱ्या निवडणुकीत आव्हानांना कशी मात द्यायला हवी, याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. जयंत पाटील यांनी तालुकाध्यक्ष ते बुथ अध्यक्षांशी संवाद साधत दोन्ही मतदारसंघाची माहिती घेतली तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, ना. जयसिंगराव गायकवाड, जीवन गोरे, माजी आमदार राहूल मोटे, आमदार विक्रम काळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, महिला निरीक्षक प्रज्ञा खोसरे, युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा माडजे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे आदी उपस्थित होते.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
