ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ जून २०२१

ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्यासावली राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाची मागणी : तहसीलदारांना निवेदन


ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयाना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळते मात्र ओबीसी ना मिळत नाही हे घटनेतील समानतेच्या तत्वाला छेद देणारे आहे त्यामुळे ओबीसी ना ही पदोन्नती मध्ये आरक्षण द्यावे यासाठी ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे कारण सन 2006 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री स्‍वरूप सिंह नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे या विषयाच्या अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली होती व या समितीनेही ओबीसींना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 19 टक्के आरक्षण द्यावे अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली होती पण त्या शिफारशी कडे आजपर्यंतच्या सर्व शासनाने दुर्लक्ष केले आहे सन 2004 मध्ये कायदा करून राज्य शासनाने एससी एसटी विजे एन टी व विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नती मध्ये रक्षण दिले  राष्ट्रीय स्तरावर हे सर्व प्रवर्ग ओबीसी मध्ये येतात पण यामध्ये ओबीसी ना आरक्षण दिले नाही. एकाला न्याय व दुसर्‍यावर अन्याय हे तत्व संविधानिक नसून समानतेच्या तत्त्वाला छेद देणारे आहे. 

मागासवर्गीयांमध्ये भेदभाव करणारे आहे .मा डॉ बबनराव  तायवाडे, श्री सचिन राजूरकर,डॉ अशोक जीवतोडे यांचे नेतृत्वात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गेली अनेक वर्षे  हा प्रश्न लावून धरला आहे वेळोवेळी निवेदने मोर्चे ही काढले याचा परिणाम म्हणून विधिमंडळात या प्रश्नासंदर्भात बैठका ही झाल्या . पण अनेक वर्षे होऊन ही ओबीसी ना न्याय मिळाला नाही .त्यामुळे स्वरूपसिह नाईक यांची शिफारस मान्य करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या बाबीकडे लक्ष देऊन ओबीसींना ही पदोन्नती मध्ये 19 टक्के आरक्षण द्यावे अन्यथा ओबीसी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने यापुढे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा श्री श्याम लेडे राज्याध्यक्ष, अनिल नाचपल्ले  राज्यसरचिटणीस यांनी दिला आहे. मा तहसीलदार  सावली   यांना निवेदन देते वेळी सावली  राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे पदाधिकारी -श्री जीवन भोयर, नरेंद्र बुधबावरे, भक्तदास कांबळे, भाऊजी किनेकर, पुरुषोत्तम टोंगे, इत्यादी  पदाधिकारी उपस्थित होते उवस्थित होते.