प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त नागपूरात; नवदाम्पत्यांना दिल्या शुभेच्छा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जून २०२१

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त नागपूरात; नवदाम्पत्यांना दिल्या शुभेच्छा
प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांची डॉ.नितीन राऊत कुटुंबियांशी सदिच्छा भेट

नागपूर ५ जून : सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उत्तर नागपुरातील बेझनबाग निवासस्थानी भेट दिली. डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा २१ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाल्याने त्यावेळेस त्यांना येणे शक्य झाले नाही. आज त्यांनी नागपूर येथे नवदाम्पत्याची भेट घेऊन आयुष्यमान कुणाल आणि आयुष्यमती आकांक्षा यांस विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. ह्या छोटेखानी भेटीत संजय दत्त यांनी राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.