सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०१ जून २०२१

सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा

प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे यांना निवेदन

सावरगांव : सतत दोन वर्षापासून सर्वत्र कोरोना महामारीने आपले पाय पसरविले आहे. कोरोनाचा   प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सतत लाॅकडाऊन करण्यात आले. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानावर झाला आहे. वेळोवेळी लघु व्यवसाय, लघु उद्योग, हात मेहनतीची कामे बंद असल्यामुळे त्याचा परीणाम विद्यार्थीच्या शैक्षणिक परीस्थितीवर झाला आहे.  मागील वर्षी आर्थिक  ओढताना करून आपल्या पाल्याच्या गरज पुर्ण करीत होते. कोरोना जाईल व विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणू असा त्यांचा आत्मविश्वास होता. परतू  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने नागरिकाच्या आर्थिक अडचणीत  भर टाकली . त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्याबाबत महाविद्यालयातून फोन करूनही 50 % विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नाही.  त्याला कारणीभूत पालकांची आर्थिक परिस्थिती ठरत आहेत. तसेही विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेत असताना  या करीता मोठ्याप्रमाणात कोणताही खर्च येत नसताना विद्यार्थ्यांवर आर्थिक भुदंड का ?  तेव्हा सारासार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे. घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे. कोरोना महामारीने विस्कटलेली आर्थिक  घडी पुर्वपूर्वपदावर येईपर्यंत विद्यापीठाने  नाममात्र परीक्षा शुल्क घेवून परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी  तालुक्यातील पालकांनी प्र-कुलगुरू डाॅ.संजय दुधे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर  यांना निवेदनाव्दारे गणेश ए.ऊईके, विवेक बालपांडे, शिरीष खोबे, गणेश उपासे, धनराज भोयर, फद्मा पंचभाई.लिलाधर कळबे, राहुल धुर्वे, हेमंत वघाळे यांनी केली. प्र-कुलगुरूनी निवेदन देणार्‍या सोबत सकारात्मक चर्चा केली.