ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांची नंदोरी ग्रामपंचायतीला भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ जून २०२१

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांची नंदोरी ग्रामपंचायतीला भेट
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
राज्याचे उर्जामंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन गावातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अध्यझ राजेन्द्र वैद्दय, मुनाज शेख,जिल्हामहीला अध्यक्ष बेबीताई उईके, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, विलास नेरकर, सुनिल दहेगावकर,शरद खमानकार सरपंच,मंगेश भोयर उपसरपंच, अजित पुसनाके सदस्य,उषाताई लांबट सदस्य,शारदा जीवतोडे सदस्य
स्वप्नील लांबट,मनीष ठक,निखील ढवस,प्रज्वल एकरे, भूषण ठेंगणे,गणेश निखाडे उपस्थित होते. मंत्री मोहदयचे शाल श्रीफळ देवुन नंदोंरी गावा तर्फे सरपंच शरद खामनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी नंदोरी गावात शरद पवार स्वागत प्रवेशद्वार उभारण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून एका निवेदनाद्वारे करण्यात आली. तथा गावातील नदीवरील रखडलेल्या बंधाऱ्याचे काम पूर्ण करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

ही दोन्ही कामे त्वरित मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. तसेच भ्रमणध्वनीवरून या दोन्ही कामांचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास न्यावे अशा सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदनही मंत्रिमहोदयांना सादर केले.यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.