चंद्रपूर : दारुविक्रीचा मुहूर्त ठरला; पण, पहिल्याच दिवशी पोलिस राबविणार ड्रंक अँड ड्राइव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ जून २०२१

चंद्रपूर : दारुविक्रीचा मुहूर्त ठरला; पण, पहिल्याच दिवशी पोलिस राबविणार ड्रंक अँड ड्राइव्ह

अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता परवाने नुतनीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दारुविक्रीचा मुहूर्त ठरला असून, येत्या जूनअखेर दारुबंदी प्रत्यक्ष सुरू होईल. दुसरीकडे पहिल्याच दिवशी राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे, हे दाखवून देण्यासाठी मद्यप्राशन करून वाहने चालविणा-यावर कङक कारवाई केली जाणार आहे. 



 
 जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकारने दारूबंदी केली. मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. यातून पोलिस कारवाईतून कोट्यवधीची दंङात्मक महसूल होत होता. ही उणीव ङ्रंक अण्ङ ङ्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. म्हणून सावधान... मद्य पिऊन वाहने चालवू नका.