कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा मदतीचा हात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जून २०२१

कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा मदतीचा हात
शिरीष उगे वरोरा प्रतिनिधी (चंद्रपूर)
: कोरोनाचा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पावले आहे. त्यामुळे कुटुंबातील करता माणूस किंवा दोन्ही मृत्यू पावल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. वरोरा तालुक्यातील दोन कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः ताई मारोती येडमे रा.वडगाव ता.वरोरा, विमल बापूराव मडावी रा.आमडी ता.वरोरा या कुटुंबाला भेट देऊन त्यांना दहा हजाराची मदत दिली आहे.
याप्रसंगी रवींद्र धोपटे, सभापती पं.स.वरोरा, मिलिंद भोयर वरोरा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, विशाल बदखल, प्रफुल आसुटकर उपस्थित होते.
मतदार संघात कोणत्याच व्यक्तीवर संकट कोसळले तर धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून धानोरकर दाम्पत्यांची ओळख आहे. आज देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्यक्ष कोरोना प्रादुर्भावाने मुत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेतली. आणि त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत दिली. यावेळी कुटुंबातील व्यक्तीचे सांत्वन देखील त्यांनी केले.