अल्पवयीन मुलीचा विवाह करून देणारे आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ जून २०२१

अल्पवयीन मुलीचा विवाह करून देणारे आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल

शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती शहरातील नागमंदिर परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आईने इतर चार जनांशी संगनमत करून केल्याची घटना काय घडली . मुलीच्या मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून आई सह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून मुलीची आई फरार आहे.
सविता अवसारे वय 49 वर्ष बसंती तांडे वय 44 राहणार भंगाराम वार्ड , विक्रम अंजीरवार वय 25 अरविंद मालवीय वय 27 दोन्ही राहणार राजापूर मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे यातील मुलीची आई संगीता ही फरार आहे .15 वर्षीय अल्पवयीन मुलीला आईने वरील दोन आरोपी च्या संगनमताने राजापूर येथे 21 एप्रिल ला विवाह लावला . या घटनेची माहिती मुलीची मोठी बहिण प्रणाली राहणार वणी हिला माहिती झाली तिने या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसांना दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी विशेष पथक तयार केले . सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी या घटनेचा पूर्ण तपास करून मध्यप्रदेश तसेच भद्रावती तुन आरोपींना अटक केली आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली यातील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.