जिल्ह्यात 24 तासात 43 कोरोनामुक्त, 54 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



१९ जून २०२१

जिल्ह्यात 24 तासात 43 कोरोनामुक्त, 54 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

चंद्रपूर,दि. 19 जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 54 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच  1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 54 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 17चंद्रपूर तालुका 5बल्लारपूर 11भद्रावती  1ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0सिंदेवाही 1मूल 1सावली 2पोंभूर्णा 1गोंडपिपरी 1राजूरा 3चिमूर 2वरोरा 2कोरपना 7जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये पोभुंर्णा  तालुक्यातील 1 महिलेचा समावेश आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 268 झाली आहे. सध्या 733 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 33 हजार 957 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 46 हजार 769 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1516 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.