तिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ जून २०२१

तिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदेवरोरा तालुक्यातील खांबाळा येथे बाजाराच्या दिवसाचे औचित्य साधुन ग्रामीण जनतेशी संवादशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
दुसरी लाट भयावह होती, या लाटेने यावेळी ग्रामीण भागात शिरकाव केला, अनेक जवळच्या तरुण मंडळींचे जिव घेतले, त्यामुळे आता वेळीच सावध होवून तिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे, असे आवाहन आज (दि.९) ला वरोरा तालुक्यातील खांबाळा येथे बाजाराच्या दिवसाचे औचित्य साधुन ग्रामीण जनतेशी संवाद साधतांना दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रविंद्र शिंदे यांनी केले.
शेतीच्या हंगामाला सूरवात झाल्याने ग्रामीण जनतेची लगबग सुरु झाली आहे. शेतीची कामे व कोरोना प्रादुर्भाव या दोहोंची सांगळ घालत ग्रामीण जनतेला हा हंगाम पार पाडावा लागणार आहे. बाजाराचा दिवस असल्याने खांबाळा परीसरातील आसपासच्या गावातील शेतकरी, शेतमजुर, महिलावर्ग, लघूव्यवसाईक आदी ग्रामीण वर्ग एकत्र झाला होता. याचे औचित्य साधुन एकाचवेळी अधिकाधीक जनतेच्या भेटी रविंद्र शिंदे यांनी घेतल्या. ग्रामीण परीसरातील सध्यस्थिती जाणून घेतली. शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या. व कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्व अडीअडचणींना हद्दपार करुन जिवन सुरक्षित करण्याविषयी मार्गदर्शन केले. सोबतच कोरोनामुक्त गाव घडविण्यासाठी साद घातली.
या निमित्ताने मास्क व सॅनिटायजरचे वाटप नागरीकांना करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, दत्ता बोरेकर, डॉ. मोरेश्वर राऊत, नामदेव जोगे, देविदास धोटे, पंढरी भोयर, अंबादास येळेकार, दादा वैद्य, प्रमोद चौधरी, विशाल बोरेकर, गणेश बोरेकर, देवराव शेंडे, सुधाकर बुदान, अभिमान जोगी, अनिल वैद्य, कालेश्वर पेटकर, व मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.