चीनने दिले रोग आणि भारताने जगाला दिले योग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जून २०२१

चीनने दिले रोग आणि भारताने जगाला दिले योग

 


Khabarbat News | China gave disease and India gave yoga to the world | Yoga Day

योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले गेले आहे. आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी भारतीय लोक योग महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे. योग हा भारतीय ज्ञानाचा पाच हजार वर्षांचा जुना वारसा आहे. महर्षि पतंजली हे योगाचे प्रणेते असल्याचे मानले जाते. योग साधनेत जीवनांचं संपूर्ण सार समाविष्ट आहे.

21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पुढाकाराने जगातील जवळपास सर्वच देशांनी निरोगी राहण्यासाठी योगाचा प्रसार करण्यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. 21 जूनच्या दिवसाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पठाणपुरा गेट पासून 1 km अंतरावर असलेल्या जगन्नाथ बाबा मठ, माना टेकडी येथे. सकाळी 8:०० वाजता योग योगाभ्यास कार्यक्रम घेण्यात आला, प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय हंसराज भैया अहिर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम स्वराज फाउंडेशन ,हिंदुराष्ट्रम, तसेच पतंजली योग समिती द्वारे घेण्यात आला. कार्यक्रमात अश्विन मुसळे, देवानंद साखरकर, अतुल आंबटकर, समीर लाभे ,जतीन पटेल, नरेंद्र लभाने, कार्तिक मुसळे, दीक्षांत बेले, एल एस मध्येवर, मनोज कोत्तेजवार, पतंजली योगपीठ हरिद्वार चे स्मिता रेभनकर, नरसिंग शेख, वनिता भूषणवार, अपर्णा दिंडे वार, वंदना संतोषवार, प्रतीक्षा धकाते, सविता मसराम, रोशनी धकाते, सबिना शेख उपस्थित होते तसेच कार्यक्रमानंतर वृक्षारोपणही करण्यात आले