अखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता "या" बातमीत बघा तारीख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ जून २०२१

अखेर तारीख ठरली; अफवावर विश्वास न ठेवता "या" बातमीत बघा तारीख

 अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता परवाने नुतनीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दारुविक्रीचा मुहूर्त ठरला असून, येत्या जूनअखेर दारुबंदी प्रत्यक्ष सुरू होईल. दुसरीकडे पहिल्याच दिवशी राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे, हे दाखवून देण्यासाठी मद्यप्राशन करून वाहने चालविणा-यावर कङक कारवाई केली जाणार आहे. सात जुलै रोजी सुरु होणार मद्यपान 

#chandrapur #daru #news #khabarbat
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता परवाने नुतनीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दारुविक्रीचा मुहूर्त ठरला असून, येत्या ७ जुलै दारुबंदी प्रत्यक्ष सुरू होईल, असे मद्यव्यावसायिकाने सांगितले.   
 जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकारने दारूबंदी केली. मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. यातून पोलिस कारवाईतून कोट्यवधीची दंङात्मक महसूल होत होता. ही उणीव ङ्रंक अण्ङ ङ्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. म्हणून सावधान... मद्य पिऊन वाहने चालवू नका. सहा जुलैपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून, सात तारखेला ११ वाजेनंतर शटर उघडतील. पहिल्या दिवशी मोठी गर्दी होऊ नये यासाठी सर्वच दुकाने सुरु राहणार आहेत. दरम्यान कोरोनाचे निर्बंध आणखी लागू झाल्याने सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत दारू उपलब्ध राहील, असेही मद्यव्यावसायिकाने सांगितले.