उगवण न झालेल्या बियाण्यांची भरपाई कधी मिळणार? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जून २०२१

उगवण न झालेल्या बियाण्यांची भरपाई कधी मिळणार?
एक वर्षापासून अन्यायग्रस्त  शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत


नरखेड : मागील वर्षी खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली होती.त्यापैकी 57 शेतकऱ्यांनी महाबीज व खाजगी कंपन्यानीचे सोयाबीन बियाणे पेरणी करीता वापर केला होता.या पैकी  57  शेतकऱ्यांच्या शेतातील  सोयाबीनचे  बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परत बियाणे मिळावी व जे उत्पादन घेऊ शकले नाही त्याची भरपाई मिळावी याकरिता  तालुका कुषी अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी चौकशी करून महाबीजने व खाजगी कंपनी ने शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले होते . त्यानुसार खाजगी कंपनी ने 26 सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी नुकसान भरपाई व थोड्या  कालावधी उत्पादन देणारे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दिलेले  होते.  परंतु महाबिजचे  बियाणे पेरलेल्या 31 शेतकऱ्यांना माहाबीज माहामडंळाकडुन नुकसान भरपाई मिळालीच नाही. त्याच बरोबर बियाणे सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना  फार मोठे नुकसान सहन करावे लागले. 

 महाबिज महामंडळाकडून सतत होत असलेली चालढकल लक्षात येताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतक-यांच्या शिष्टमंडळाने कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद नागपूर यांची भेट घेऊन निवेदन दिले.व नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्यात यावी याबाबत विनंती केली. सभापती यांना निवेदन देतांना कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मोजक्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत कृषी सभापती याना निवेदन दिले 
          यावेळी श्री.गणेश ऊईके,नितीन राऊत,विवेक बालपांडे, विजय रेवतकर, अनिकेत सावंत, राहुल धुर्वे याची प्रामुख्याने  उपस्थिती होती.