ऑटो मधून दारूची वाहतूक तीन आरोपी अटकेत #deshi #videshi - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ जून २०२१

ऑटो मधून दारूची वाहतूक तीन आरोपी अटकेत #deshi #videshi
शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी) : वणी वरून तेलवासा मार्गे ऑटो मधून दारूची वाहतूक करीत असताना भद्रावती पोलिसांनी तीन आरोपी सह एक लाख पन्नास हजाराचा देशी-विदेशी दारुसाठा जप्त केला ही कारवाई शनिवार ला रात्री दरम्यान करण्यात आली.
यातील ऑटो चालक दिवाकर दिलीप बावणे वय 30 वर्ष,आशिष कैलास राऊत वय 22 राहणार चंद्रपूर शहाबास सादिक शेख वय 19 वर्ष राहणार वनी अशी आरोपींची नावे आहे हे ऑटो क्रमांक एम एच चौतीस बी 6735 ने वणी वरून तेलवासा मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे या परिसरात नाकाबंदी करून तीन आरोपी ऑटो, दारू असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार ,केशव चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.