सातारा,कराड जिल्ह्यातील विरगळांची उपेक्षा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ जून २०२१

सातारा,कराड जिल्ह्यातील विरगळांची उपेक्षा

सातारा,कराड जिल्ह्यातील विरगळांची उपेक्षा 

दि. ११ जुन  २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/356HbmV
सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्यांची ओळख,वैभवशाली इतिहास आजही अभिमानाने मिरवला जात असून प्राचीन,मध्ययुगीन तसेच आधुनिक इतिहासात जिल्ह्यातील महापुरूषांचे, वीरांचे योगदान अन्ययसाधारण असेच आहे.
यापैकीच अनेक वीरांच्या स्मृतीही या दोन्ही तालुक्यातील विविध गावात विखुरल्या असून ही स्मृती गावोगावी भग्नावस्थेत उपेक्षा सहन करत आहेत.

एखाद्या युध्दात, गावच्या रक्षणार्थ, देव - देश आणि धर्मासाठी ज्या वीर पुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असेल, अशाच वीर पुरूषांनी दिलेल्या आत्मबलिदानाच्या स्मरणार्थ त्याच्या राजाकडून, गावकरी किंवा कुटुंबाकडून वीर पुरूषांची स्मारके उभारली गेली आहेत. हीच स्मारके वीरगळ म्हणून ओखळली जातात. महाराष्ट्रात गावोगावी अशा वीरगळ सापडतात. त्या बहुतांश जुन्या शिव मंदिरा जवळ किंवा ग्रामदैवतांच्या मंदिराजवळ व नदी, ओढ्या काठी अथवा रानावनात विखुरलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात. भारतात प्राचीन काळापासून स्मारके बनविण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र ही संतांची, शूर वीरांची, सत्पुरूषांची भूमी आणि म्हणूनच ही धारातीर्थे अजूनही मोठ्या भक्तीभावाने पुजली जातात. तुलसी वृंदावन, समाधी, शिवलींग, घुमटी, देवळी, वीरगळ, सतीशिळा अशा स्वरूपात स्मारके उभारून आपल्या पूर्वजांचे स्मरण करून देतात आणि पिढ्यानपिढ्या या स्मारकांकडून प्रेरणा व स्फूर्ती देतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,मात्र या स्फूर्ती स्थानां बाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृतीची आवश्यकता असून अज्ञानापोटी अनेक ठिकाणी वीरगळ उपेक्षा सहन करत असल्याचे दुर्दैवी चित्र पहावयास मिळत आहे.अनेक गावांत वीरगळ हे विरांच्या बलिदानाचे प्रतिक असल्याची माहितीच नाही. त्यामुळेच वीरगळ असलेल्या ठिकाणी अनेकदा ग्रामस्थांकडून विशेषत: महिलांकडून पूजा-अर्चा होताना पहावयास मिळते.
🔹अंधश्रद्धेतून स्मारकांना निर्माण होतो धोका ...🔹
वीरगळ् म्हणजे एक स्मारक असून समाजात याविषयी अंधश्रध्दा पसरली आहे, या वीरगळ स्मारकांना देवाचे रुप किवा देवाचे पाठीराखे समजून त्यांची हळदी कुंकू लावून पुजा केली जाते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट वास्तविक पाता पुरातत्विय दृष्टिकोनातून सांगयचे झाल्यास त्या दगडी शिल्पाचे आयुष्य कमी होऊन त्या स्मृती शिळा भग्न होऊ लागल्या आहेत. यासाठी गावोगावी याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.

सातारा,कराड जिल्ह्यातील विरगळांची उपेक्षा

🔹वीरगळ सापडणारी गावे व ठिकाणे...🔹

कार्वे - लक्ष्मी मंदिर,
ज्योतिर्लिंग मंदिर.
खोडशी - कोटेश्‍वर महादेव मंदिर.
कोपर्डे हवेली - सटवाई मंदिर,
पानवट्याकडील महादेव मंदिर,स्मशानभूमीच्या बाजूच्या शेतात.
जखिणवाडी - मळाईदेवी मंदिर.
तळबीड - महादेव मंदिर, राम मंदिर.
बेलवडे हवेली - हनुमान मंदिर.
वडोली निळेश्‍वर - निळेश्‍वर महादेव मंदिर.
इंदोली - मरिआई मंदिर.
कापिल - ज्योतिर्लिंग मंदिर.
गोळेश्‍वर - गोळेश्‍वर महादेव मंदिर.
शहापूर - ज्योतिर्लिंग मंदिर.
टेंभू - ज्योतिर्लिंग मंदिर.
शिरवडे - ज्योतिर्लिंग मंदिर, हनुमान मंदिर.
रेठरे बुद्रूक - महादेव मंदिर.
साजूर - साजूरेश्‍वर महादेव मंदिर.
साकुर्डी - हनुमान मंदिर, जोतिर्लिंग मंदिर.
किरपे - लक्ष्मी नारायण मंदिर.
सुपने (जुने)- महादेव मंदिर, हनुमान मंदिर.
म्होप्रे - ज्योतिर्लिंग मंदिर, लक्ष्मी मंदिर.
विहे - ज्योतिर्लिंग मंदिर.
मारूल हवेली - सिध्देश्‍वर महादेव मंदिर, निनाई मंदिर.
खळे (तळमावळे)- महादेव मंदिर.
आडूळ (जुने) - क्षेत्रपाल मंदिर, गणेश मंदिर.
चाफळ - चाफेश्‍वर महादेव मंदिर.
माजगाव (चाफळ) - महादेव मंदिर.
नावडी- जोर्तिलिंग मंदिर.
या गावातुन शिल्प व विरगळ पाहावयास मिळतात,याचे जतन झाले पाहिजे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498