म्हणून टायरचा रंग काळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ जून २०२१

म्हणून टायरचा रंग काळा

⚫ ...म्हणून टायरचा रंग काळा! ⚫

फेसबुक लिंक http://bit.ly/2Tvkg1N
कधी कधी आपल्या आजूबाजूला रोज आपण अनेक गोष्टी पाहत असतो; पण त्या ‘तशा’च का आहेत याचा विचार आपल्या मनात कधी येत नाही. काही चौकस, जिज्ञासू लोकांच्या मनात मात्र कधी तरी असे विचार डोकावत असतीलही. गाडीच्या टायरचा रंग हा काळाच का असतो असा विचार आपण कधी केला आहे का? जगात कुठेही गेले तरी टायर ही काळीच दिसून येईल. भारतातच नव्हे तर परदेशात कारचे देखील काळ्या रंगाचे टायर्स असतात.
सर्व साधारपणपणे रबराचा रंग हा दगडी असतो. मात्र, टायर बनवला जातो त्यावेळी त्याच्या रंगात परिवर्तन होते.

म्हणून टायरचा रंग काळा, so the color of the tire is black!

साधारण रबरने तयार केलेला टायर घर्षणामुळे लवकर झिजतो.  त्यामुळे पूर्वी त्याला वारंवार बदलावे लागे. पुढे  या समस्येवर संशोधन झाले आणि यातून एक नामी उपाय शोधण्यात आला. रबरी टायर तयार करताना त्यात सल्फर आणि कार्बन मिसळण्यात आले आणि यातून एक मजबूत टायर तयार झाला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,टायरला ‘व्हल्कनायझेशन’ या प्रक्रियेतून टायर बनवली जाते. नैसर्गिक रबर म्हणजेच लेटेक्समध्ये कार्बन ब्लॅक मिसळले जाते. त्यामुळे हे रबर मजबूत होते आणि लवकर झिजत नाही. जर साध्या रबराचे टायर आठ हजार किलोमीटर जात असेल तर कार्बनयुक्त टायर एक लाख किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. काळ्या कार्बनच्याही अनेक श्रेणी असतात. त्यामध्ये सल्फरही मिसळले जाते. कार्बन ब्लॅकमुळेच टायर काळी दिसत असते. त्यामुळे टायरीचे अल्ट्राव्हायलेट म्हणजेच अतिनील किरणांपासूनही रक्षण होते. तसे पाहता लहान मुलांच्या सायकलींच्या टायर वेगवेगळया रंगांच्या असू शकतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये चक्क सफेद टायरीही असत; मात्र मजबुती आणि सुरक्षेसाठी आता जगभर अशा काळ्या टायरच वापरल्या जातात.तुमची गाडी मग ती कोणत्याही रंगाची असो टायर मात्र काळया रंगाचाच असणार याचे कारण हे आहे
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

=======================================
⚫ ... so the color of the tire is black! ⚫

Facebook link http://bit.ly/2Tvkg1N
Sometimes we see so many things around us every day; But we never think about why they are like that. Some curious, curious people, however, may have such thoughts at some point. Have you ever wondered why the color of a car tire is black? No matter where you go in the world, the tires will be black. Not only in India but also abroad, cars have black tires.
In general, the color of rubber is stone. However, when a tire is made, its color changes.

So the color of the tire is black

A tire made of ordinary rubber wears out quickly due to friction. So in the past he had to change frequently. This problem was later researched and a well-known solution was found. When making rubber tires, sulfur and carbon were added to it and this made a strong tire. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon. Carbon black is mixed in natural rubber i.e. latex. So this rubber is strong and does not wear out quickly. If a simple rubber tire travels 8,000 kilometers, a carbon tire can travel up to 100,000 kilometers. There are also several categories of black carbon. It also contains sulfur. Carbon black makes tires look black. It also protects the tire from ultraviolet rays. By the way, the tires of children's bicycles can be of different colors. There were also pretty white tires in the early decades of the twentieth century; But for strength and safety, only black tires are used all over the world. This is the reason why your car will be black no matter what color it is.
Mahiti seva Group Pethwadgaon
9890875498