हरविलेल्या ९ वर्षाच्या बालकाला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोंढाळी पोलिसांच्या मदतीने सुखरुप घरी पोहचविले. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जून २०२१

हरविलेल्या ९ वर्षाच्या बालकाला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोंढाळी पोलिसांच्या मदतीने सुखरुप घरी पोहचविले.
दि २१ जुन २०२१ ला सायंकाळी ८च्या सुमारास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपुर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आकाश गजबे यांच्या बालाजी नगर कोंढाळी येथील घराच्या परीसरात ९ वर्षीय अनोळखी बालक रडत असल्याचे निदर्शनास आले. या बालकाला घेऊन ते थेट कोंढाळी पोलीस स्टेशनला घेऊन दाखल झाले. कोंढाळी पोलिस स्टेशन ठाणेदार श्री विश्वास पुल्लवार यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठीत नागरीकांच्या मदतीने आजुबाजुच्या जिल्हा व तालुक्यांमध्ये माहीती मिळविण्याच्या प्रयत्न केला असता वर्धा जिल्ह्य़ातील कारंजा तालुक्यातील राजनी गावातील १ बालक हरविल्याची माहीती प्राप्त झाली व बालकाची ओळख अवघ्या १ तासात प्राप्त होताच कोंढाळीचे ठाणेदार श्री विश्वास पुल्लवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आकाश गजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महासचिव नितीन ठवळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत खंते,  अफसर हुसेन यांनी रात्री ताबडतोब रात्री ११च्या सुमारास वर्धा जिल्ह्य़ातील राजनी या गावात जाऊन योग्य चौकशी करुन मुलाची खात्री पटविली व त्या बालकाच्या मातेकडे मुलाला ताब्यात दिले. तिच्याकडे चौकशी केली असता तिचे नाव श्रीमती सोमी गजानन शिवरे वय ४० असे सांगीतले तर हरवलेला बालकाचे नाव कु देविलाल शिवरे असुन बालक हा तीचाच असल्याचे सांगितले. या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून कोंढाळी पोलीस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.