भद्रावती तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश मत्ते यांची अविरोध निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ जून २०२१

भद्रावती तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश मत्ते यांची अविरोध निवड

 

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी): 

तालुका पोलिस पाटील संघटनेद्वारा पोलीस स्टेशन येथे दि.७ जून रोजी झालेल्या पोलीस पाटील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत चपराळा येथील पोलीस पाटील योगेश रामदास मत्ते यांची अविरोध निवड करण्यात आली.ही निवड जेष्ठ पोलीस पाटील राजेन्द्र पोईनकर यांच्या अध्यक्षतेखाली व कुशल मार्गदर्शनात करण्यात आली.

  यासोबतच नविन कार्यकारिणी नेमण्यात आली.अध्यक्ष योगेश मत्ते,उपाध्यक्ष सुनीता ठोंबरे पिपरी,सचिव देऊबाबा परसे चालबर्डी(रै.),सहसचिव सपना कातकर कुरोडा, प्रसिद्धीप्रमुख विजय गेडाम घोडपेठ,सल्लागार राजेन्द्र पोईनकर काटवल,तर सदस्यपदी दीपक कुंभारे कांसा,ज्योत्स्ना मानगुलधे गुळगाव,नितेश कुरेकार कोकेवाडा, सुषमा रामटेके मोहबाळा, सुनीता पाटील देऊळवाडा यांची अविरोध व सर्वानुमते निवड करण्यात आली.या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.