रिक्षा नव्हे, तीन चाकी कार ! अशी कार भारतात होती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० जून २०२१

रिक्षा नव्हे, तीन चाकी कार ! अशी कार भारतात होती

रिक्षा नव्हे ,तीन चाकी कार ! अशी कार भारतात होती 

                 
  ❍ दिनांक - १०.०६.२०२१. ❍

फेसबुक लिंक http://bit.ly/3ivkL6t
🇦 तीन चाकी वाहन कोणते म्हणुन कोणालाही विचारले तर त्याचे उत्तर "रिक्षा" हेच असेल.पण तीन चाकी कारचा कोणी विचारही करणार नाही.पण तीन चाकी कार आपल्या भारतातसुद्धा होती.तिचे नाव होते "सिपानी".

तीन चाकी कार ! रिक्षा नव्हे  अशी कार भारतात होती,Three wheeled car! There was a car in India that was not a rickshaw,

राम बलराम चित्रपटात आमिताभ बच्चन व धर्मेन्द्र ने "एक रास्ता" या गाण्यावेळी हि कार वापरलेली आपणास पाहावयास मिळते.ही कार सुरुवातीला सनराईज ऑटोमोटिव्ह लिमिटेड यांच्यामार्फत बनविली जात होती. पुढे जाऊन तिचे नाव सिपानी लिमिटेड करण्यात आले.यानंतर कंपनीने "बादल" नावाने १९७६ ला मार्केटमध्ये लॉन्च केली. तीन चाके आणि तीन दरवाजे अशी या कारची डिजाईन होती.,पॅसेंजर साईडला दोन दरवाजे, तर ड्रायव्हर साईडला एक दरवाजा अशी या कारची रचना करण्यात आली होती.या गाडीत ३-४ लोक आरामात बसू शकत असत.या कारला १९८सीसी ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन होते. ही कार फायबर ग्लासची बनविण्यात आली होती.
कारचे उत्पादन १९६६ मध्ये सुरू झाले. ही तीन चाकांची असामान्य दिसणारी कार होती जी लहान सीसीसी इंजिनद्वारे चालविली जात होती.  जी ९.८ एचपी उर्जा उत्पादन करते. इंजिन मागील  माउंट केलेले होते आणि मागील चाकांना शक्ती देण्यास वापरले जाते.या कंपनिला त्यावेळी बजाजची रिक्षा व लॅम्ब्रेटरची रिक्षा प्रति स्पर्धी होती.पण तीन चाकी मॉडल लोकांना काहीसे आवडले नाही.जर विक्रीचा आलेख पाहिला तर कंपनी १९७७ मध्ये २०० च्या आसपास युनिट विकू शकली होती,तर पुढच्या वर्षी मागणी वाढून ३५० युनिट्सवर गेली. त्यानंतरच्या वर्षात ही मागणी केवळ १०४ वर आली.१९८१ पर्यंत केवळ ५५ युनिटस विक्री झाली.कंपनी तोटयात जाऊ लागल्याने हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही हे बघून कंपनीने मग यातच बदल करून ४ व्हीलर कार मार्केटमध्ये आणली.पण तोही प्रयत्न फसला. बादलची चार चाके आवृत्ती आणि डॉल्फिन, माँटाना आणि माँटेगो यासारखी आणखी काही मॉडेल्स आणूनही ही कंपनी भारतीय बाजारामध्ये आपला ठसा उमटवू शकली नाही.
हळूहळू करत १९९० साली  सिपानी कार बंद झाली.आता ही कार फक्त संग्रहालयात पाहावयास मिळते.  

               ✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
-------------------------------------------
Three wheeled car! There was a car in India that was not a rickshaw


____________________________
Facebook link http://bit.ly/3ivkL6t
🇦 If anyone asks what a three wheeler is, the answer will be "rickshaw". But no one will think of a three wheeler. But there was also a three wheeler in India. Its name was "Sipani".


You can see the car used by Amitabh Bachchan and Dharmendra in the song "Ek Rasta" in the movie Ram Balram. This car was initially manufactured by Sunrise Automotive Limited. It was later renamed as Sipani Limited. The company launched it in the market in 1976 under the name "Badal". The car was designed with three wheels and three doors. You are reading the information service group Pethwadgaon Post, the car was designed with two doors on the passenger side and one door on the driver side. The car could seat 3-4 people comfortably. The car had a 198 cc 4 stroke petrol engine. This car was made of fiberglass.
Production of the car began in 1966. It was an unusual looking three-wheeled car driven by a small CCC engine. G produces 9.8 hp of power. The engine was rear mounted and used to power the rear wheels. At that time, the company had Bajaj rickshaws and Lambert rickshaws in competition. But people did not like the three-wheeler model. If you look at the sales graph, the company could sell around 200 units in 1977. The following year, the demand increased to 350 units. In the following year, the demand was only 104 units. By 1981, only 55 units had been sold.
Seeing that the expected response from the people is not getting, the company changed this and brought 4 wheeler car in the market. But even that attempt failed. The company has not been able to make its mark in the Indian market with the introduction of the four-wheeled version of the cloud and a few more models like the Dolphin, Montana and Montego.
Gradually, the Sipani car was discontinued in 1990. Now this car can only be seen in museums.
               𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498
                  ❍ Mahiti seva Group
Pethwadgaon, Dist. Kolhapur
-------------------------------------------