मोदी सरकारचा विरोधात दरवाढविरोधी वरोरा मध्ये आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ जून २०२१

मोदी सरकारचा विरोधात दरवाढविरोधी वरोरा मध्ये आंदोलन

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मोदी सरकारवर टीका

मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे मोदी सरकार : खासदार बाळू धानोरकरशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. सामान्य गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडले आहे. मोदी सरकारला जनता कधीच माफ करणार नाही अशी टीका आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. वरोरा येथे मोदी सरकारचा विरोधात दरवाढविरोधी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे अशी टीका त्यांनी केली.
यावेळी खासदार बाळू धानोरकर, अध्यक्ष वरोरा शहर विलास टिपले, वरोरा शहर तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, उपाध्यक्ष वरोरा शहर मनोहर स्वामी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा राजू चिकटे , उपाध्यक्ष न.प.वरोरा अनिल झोटिंग , सभापती पं स वरोरा रवींद्र धोपटे , नगरसेवक राजू महाजन, अनिल वरखडे, गजानन मेश्राम, प्रशांत काळे, उपसभापती कृषी उ.बा.स. वरोरा देवानंद मोरे , सुभाष दांडदे, निलेश भालेराव, उपसभापती संजीवनी भोयर, शिरोमणी स्वामी, यशोदा खामनकार, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित