शिरसंगीतील दीड एकरात पसरलेंले वडाचे झाड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० जून २०२१

शिरसंगीतील दीड एकरात पसरलेंले वडाचे झाड

 

🌳 शिरसंगीतील दीड एकरात पसरलेंले वडाचे झाड  
____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________
शिरसंगी ता. आजरा हे कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण गाव पण एका वडाच्या झाडामुळे चर्चेत आले आहे.आजऱ्यापासून दहा किलोमीटरवर नेसरी रस्त्यावर शिरसंगी हे छोटे गाव आहे. तब्बल दीड एकर पेक्षाही अधिक क्षेत्रात हे झाड पसरलेले आहे. झाडाच्या अनेक पारंब्या जमिनीत रुजून त्यापासूनच हा महाकाय वटवृक्ष आजही तग धरून आहे. या झाडाचे अदमासे ३०० वर्ष असावे असे जाणकार सांगतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,झाडाच्या मुख्य खोडाचा घेरा ३०० मीटर आहे.या झाडाखाली गोठणदेव नावाचे जागृत देवस्थान आहे.मात्र, या ठिकाणी महिलांना यायला परवानगी नाही.पण काळाप्रमाणे परिस्थिती बदलत असुन हळुहळू महिलाही येथे येऊ लागल्या आहेत.या देवावर ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा आहे.आजूबाजूच्या गावातील नागरिकसुद्धा नेहमी देवाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या सर्वच इच्छा आकांक्षा देव पूर्ण करतो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.हे वडाचे झाड "जोगवा" या मराठी चित्रपटात दाखवले आहे.या झाडावर अनेक पक्ष्यांचा, कीटकांचा अधिवास आहे.कधी आजरा भागात गेलात तर या झाडाला अवश्य भेट दया.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
शिरसंगीतील दीड एकरात पसरलेंले वडाचे झाड ,Vada tree spread over one and a half acre in Shirsangi
======================================================

Vada tree spread over one and a half acre in Shirsangi
____________________________
Mahiti seva Group Pethwadgaon
____________________________
Shirsangi Ta. Ajra is a simple village in Kolhapur district but it has come into the limelight due to a Vada tree. Shirsangi is a small village on Nesari Road, 10 km from Ajra. The tree is spread over an area of ​​more than one and a half acres. This huge banyan tree has survived to this day by rooting in many parambaya lands of the tree. Experts say that the age of this tree should be around 300 years. You are reading the post of Mahiti seva Group Pethwadgaon, the circumference of the main trunk of the tree is 300 meters. Women have also started coming here. The villagers have great faith in this God. The citizens of the surrounding villages also always come to see God. The villagers believe that God fulfills all their desires and aspirations. This Vada tree is shown in the Marathi film "Jogwa". This tree is inhabited by many birds and insects.
Mahiti seva Group Pethwadgaon
9890875498