गाण्याची पुस्तके - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ जून २०२१

गाण्याची पुस्तके

.


🔹 गाण्याची पुस्तके 🔹
___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
___________________________
गाणी गुणगुणणे हा एक वेगळाच छंद म्हणायला हवा.आमच्या लहानपणी कोल्हापूरच्या एस टी स्टॅण्डवर आम्ही गाण्याची पुस्तके आणायला जात असु.जनी नविन मराठी हिंदी गाण्याची पुस्तके तेव्हा १ रूपयाला एक मिळत असे.(फक्त एका चित्रपटाचे ६ पानी छोटे पॉकेट बुक) तर अनेक गाण्याचे पुस्तक चार रूपयाला मिळे.
ही पुस्तके आणुन चालीप्रमाणे गुणगुणणे हा वेगळाच आनंद असे.

गाण्याची पुस्तके,Books of old movie songs,
गाण्याची पुस्तके

सिनेमांची माहिती पुस्तिका, जुन्या काळातल्या सिनेमांच्या गाण्यांची पुस्तके, काही तिकिटं अनेकांच्या संग्रही आहेत.आता आधुनिक काळात विविध गाणी थेट मोबाइलवर ऐकायला मिळतात. इंटरनेटच्या माध्यमातून हिंदी, मराठी वा आवडीची गाणी डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पण ज्या काळात सिनेविश्वाला आधुनिकतेचा स्पर्शही झाला नव्हता तेव्हा हिंदी सिनेमांचे कथानक व गाणी असलेल्या पुस्तिका मिळत असत.
जुन्या हिंदी सिनेमांतील गाण्यांची पुस्तके त्या काळी रस्त्यावर विकत मिळायची. पेपर स्टॉलवर मिळायची.पाॅकेट बुक आकाराची ही छोटी पुस्तिका लक्ष वेधुन घेत असे. "बिनाका गीत माला" ची पुस्तिका सुध्दा मिळत असे. अनेकजण आपल्या आवडत्या चित्रपटातील गाणी गुणगुण्यासाठी हमखास हि पुस्तिका निवडत. कोल्हापूर  एस.टी.स्टॅण्डच्या पेपर स्टॉल वर मी अनेकदा या पुस्तिका खरेदी केल्या होत्या. चित्रपट प्रमाणेच ठरविक गायकांच्या पुस्तिका सुध्दा मिळत असत.
"रफी की याद मे" , "सदाबहार लता के नगमे" , " मुकेश के नगमे" अशी त्या पुस्तिकेची नावे असत. तेव्हा ही पुस्तिका अगदी नाममात्र किमतीला मिळत असे. आठ आण्यापासून ऐंशी पैशांपर्यंत गाण्याच्या या पुस्तिका मिळत असे.चित्रपटाच्या या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर चित्रपटाचे नाव, कलाकारांचा फोटो तसेच दिग्दर्शक, कथा, संगीतकार यांचे नावाचा उल्लेख असायचा. पुस्तकाच्या दुसऱ्या पानावर चित्रपटाचा सारांश लिहिलेला असायचा आणि मग मुख्य गाण्यांची सुरवात असायची. या चित्रपटांमधील गाणी अर्थपूर्ण असल्याने श्रोते हि गुणगुणत असत. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498गाण्याची पुस्तके,Books of old movie songs,

गाण्याची पुस्तके,Books of old movie songs,===============================================
🔹 Song books
___________________________
Mahiti seva Group Pethwadgaon
___________________________
Singing songs is a different hobby. When we were children, we used to bring song books to the ST stand in Kolhapur. Jani used to get new Marathi Hindi song books for Rs. Get the rupee.
Bringing these books and praising them as usual was a different joy.

Cinema brochures, old movie song books, some tickets are in the collection of many. Nowadays in modern times various songs can be heard directly on mobile. There is a facility to download Hindi, Marathi or favorite songs through internet. But at a time when the cinema world was not even touched by modernity, booklets with stories and songs of Hindi movies were available.
Books of songs from old Hindi movies were sold on the streets at that time. I used to get it at the paper stall. The booklet "Binaka Geet Mala" was also available. Many people choose this booklet to sing songs from their favorite movies. I had bought these booklets many times at the paper stall of Kolhapur ST stand. Like the movies, booklets of certain singers were also available.
The names of the booklets were "Rafi Ki Yaad Mein", "Sadabahar Lata Ke Nagme", "Mukesh Ke Nagme". This booklet was then available at a nominal price. I used to get these booklets of songs from eight annas to eighty paise. The second page of the book contained a summary of the film and then the main songs. The songs in these films were meaningful and the listeners were praising them. Now only memories remain.
MAHIUTI SEVA Group Pethwadgaon
9890875498


Song books

Song books