गांजा तस्करी करणाऱ्या महिले सह युवकास अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ जून २०२१

गांजा तस्करी करणाऱ्या महिले सह युवकास अटक


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी )
: वरोरा काडून भद्रावती मार्गे चंद्रपूर कडे दुचाकीने गांजा घेऊन जात असताना भद्रावती पोलिसांनी नाकाबंदी करून महिले सह युवकाला ताब्यात घेतले ही कारवाई सोमवारला करण्यात आली.
यातील साजिद शेख रफिक शेख वय 31 राहणार शंकर पावली गिरड जिल्हा वर्धा रुकसाना शेख युसुफ शेख वय 21 मीना टाऊन नागपुर असे आरोपीचे नाव आहे . हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 31 ए यु 77 63 वाहनाने वरोरा हुन चंद्रपूर कडे गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता यातील दोन्ही आरोपींना अटक केली. यांचे जवळ 2255 ग्राम गांजा किंमत 22 हजार 550 व वाहन असा 83 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.  ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, रोहित चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.