मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने सतर्क राहावे : आमदार प्रतिभाताई धानोरकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ जून २०२१

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने सतर्क राहावे : आमदार प्रतिभाताई धानोरकरवनविभागाच्या विविध समस्यांवर जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीत काढला तोडगा


शिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी
      : वरोरा विधानसभेच्या भद्रावती तालुक्यातील मौजा मुधोली, चंदनखेडा, भामडेळी, मोहर्ली, आष्टी, कटवळ, कोडेगांव, विसापूर, वेगाव तू, गुळगांव, वाडेगांव व वडाळा तू येथील सरपंच व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे वनविभागाच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
यात प्रामुख्याने पद्मापूर ते मुधोली पर्यंत रोडवर लावलेले अनावश्यक ब्रेकर काढणे बाबत, टीसीएमच्या खोदलेल्या नाल्या बुजविणे, पद्मापूर तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करणे, पद्मापूर येथून जाणाऱ्या ग्रामस्थांना २४ तास प्रवेश देणे, पर्यटन व बांबू विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून सामाजिक दायित्व निधीची कामे करणे, सितारामपेठ ते मुधोळी डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत हद्दीत व वेशीवर वनविभागामार्फत होणाऱ्या कामांची ग्रामसभेकडून परवानगी घेणे,
वन्यप्राण्यांमुळे मृत्यू मुखी पडलेले प्रलंबित दावे निकाली काढणे इत्यादी मुद्यांवर बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे सह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोअर व बफर , सुधीर मुडेंवार, माधव जीवतोडे व परिसरातील सरपंच उपस्थित होते.