पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी केले रक्तदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ जून २०२१

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी केले रक्तदानशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी): वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून युवासेनाप्रमुख आदित्य उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
त्यावेळी बलदेव बावणे यांच्या परिवाराला शिवसेना वरोरा तालुका तर्फे अकरा हजार रुपयाची मदत देण्यात आली. तर घेतलेल्या उपक्रमाला वरोऱ्यातील मंडळींनी भेट देऊन सामाजिक उपक्रमकरिता सरळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमावेळी आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधलीकी जपून 51 रकदात्यांनी रक्तदान केले. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते, उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, शहर प्रमुख वरोरा संदीप मेश्राम, नगरसेवक दिनेश यादव , उपशहर प्रमुख समीर हक्के, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, तालुका प्रमुख युवासेना भूषण बुरेले, शहर प्रमुख युवासेना प्रज्वल जानवे, शिवसैनिक बंडू खैरे, शिवसैनिक अनिल गाडगे, शिवसैनिक सचिन अवघडे, शिवसैनिक युवासैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे हे होते.