बोढाळा येथे एकाच रात्री चार घरफोड्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ जून २०२१

बोढाळा येथे एकाच रात्री चार घरफोड्या


बोढाळा येथे एकाच रात्री चार घरफोड्या
१.९४ लाखाचा माल लंपास
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात)
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या बोढाळा येथे चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री एकाच रात्री पाच घरी घरफोडी करून एक लाख ९४ हजार ७०० रुपयांचा माल लंपास केला. प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार चोरट्यानी नरहरी नामदेव नागपुरे वय ४९ वर्ष रा. बोढाळा यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला व स्वयंपाक घरात ठेवलेल्या आलमारीतून ३ तोळ्यांचे मंगळसुत्र चोरले,त्यानंतर नरहरी नागपूरे यांच्या शेजारी राहणारे त्याचे काका विठ्ठल नागपुरे यांचे घरून २ तोळ्यांचे मंगळसुत्र व नगदी ७० हजार रुपयावर हाथ साफ केला.चोरटयांनी आपला मोर्चा वळवत स्थानिक अशोक पडोळे यांच्या घरचे एक तोळ्याचे मंगळसूत्र व दिलीप पडोळे यांच्या घरून ३ हजार ५०० रुपये तसेच किसन नागपुरे यांचे घरून ७०० रुपये नगद व चांदीचे शिक्के चोरून पोबारा केला.ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरिक्षक साजिद अहमद पुढील तपास करीत आहे.