वाहनांची चोरी करणारी टोळी गजाआड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ जून २०२१

वाहनांची चोरी करणारी टोळी गजाआड

वाहनांची चोरी करणारी टोळी गजाआड 
पाच आरोपींना अटक,चोरीचे वाहने जप्त
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात)
आपसात संगमत करून विविध राज्यातून वाहने चोरी करून नंबर प्लेट चे पाच आरोपींना वाडी पोलिसांनी अट्टक करून त्यांच्याकडून चोरीचे वाहने जप्त केली आहे. प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार फिर्यादी गौरव प्रताप पाटणकर रा. गजानन सोसायटी वाडी यांनी २७ डिसेंबरला स्थानिक आशा हॉस्पिटल समोर काळ्या रंगाची स्प्लेन्डर गाडी क्रमांक एम. एच.४० बी ८९८० ठेऊन औषधी घेऊन आली असता गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच वाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.पोलीस तपास करीत असताना गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपीं भोजराज नामदेव गजभिये वय ३० वर्ष रा. आजनगांव पांढुरणा छिंदवाडा,निखिल पन्नालाल गोयते वय २० वर्ष रा. मन्नातखेडी नरखेड,सौरभ दिलीप चनकापुरे वय २१ वर्ष रा. मन्नातखेडी नरखेड,अंकित आनंद पाटील वय २३ वर्ष रा. इसापूर काटोल,शुभम बंडू राऊत वय २१ वर्ष रा. मन्नातखेडी नरखेड आदींनी नागपूर,अमरावती,सावनेर,नरखेड, मध्यप्रदेश मधील सौन्सर,पांढुर्णा,मूलताई, अशा विविध ठिकाणावरून वाहन चोरी करून नंबर प्लेट बद्दलविलेली १९ वाहने अंदाजे किंमत पाच लाख ५५ हजाराची वाहने जप्त केली.अशी माहिती ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांनी दिली.सर्व आरोपी विरोधात कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास दुय्ययम पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे,उपनिरीक्षक साजिद अहमद,हवालदार प्रमोद गिरी,नापोशी संतोष उपाध्याय,मुनींद्र इनवाते,शिवशंकर रोठे,ईशवर राठोड,राजेश धाकडे करीत आहे.