५ जून रोजी येथे होईल लसीकरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ जून २०२१

५ जून रोजी येथे होईल लसीकरणचंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या आरोग्य विभागच्या वतीने ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. शनिवार, दि. ५ जून २०२१ रोजी सुरू असलेली लसीकरण केंद्र सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत राहतील. 
पहिला आणि दुसरा डोस* (कोविशिल्ड) साठी १. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड, २. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वॉर्ड ३. सावित्रीबाई फुले शाळा, नेताजी चौक, ४. मातोश्री शाळा, तुकुम

केवळ दुसरा डोस* (कोव्हॅक्सीन) १. एरिया हॉस्पिटल, लालपेठ २. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका, नागपूर रोड ३. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यथे राहणार आहे. 

- संपूर्ण लसीकरण ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.  कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा. दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील. विनाकारण गर्दी करू नये. 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.