एक लाख पन्नास हजाराचा सुगंधित तंबाखू जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ जून २०२१

एक लाख पन्नास हजाराचा सुगंधित तंबाखू जप्तशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)-
संचार बंदीच्या काळात सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असताना सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूची विक्री सर्रास सुरू आहे. पोलिसांनी आज एका सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर धाड टाकून त्याच्याकडून १ लाख ५0 हजाराचा माल जप्त केला. ही कारवाई आज दि. ३ जून ला दुपारी करण्यात आली.
साजिद शकील शेख वय 23 वर्ष राहणार चंडिका वार्ड असे आरोपीचे नाव असून त्याचे घरी सुगंधी तंबाखू चा साठा असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे घराची झडती घेतली. असता त्याचे घरी 370 नग असा एक लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे संचार बंदीच्या काळात इतर व्यवसायिकांची दुकान बंद असली तरी सुगंधीत तंबाखू विक्री चे प्रमाण शहरात गल्लोगल्ली सुरू आहे.  मात्र या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन कुंभ करणाची झोप घेत असताना यावर अंकुश आणण्यासाठी भद्रावती पोलिसांनी विशेष मोहीम उभारली आहे.  ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान, शशांक बदमवार यांनी केली.