तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ जून २०२१

तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) :
वरोरा तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी असलेल्या दिनेश गोरवे वय 39 या इसमावर सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजू झिंगे राहणार जामगाव व 38 धारदार चाकूने हल्ला चढविला त्यात दिनेश गोरवे गंभीर जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. जखमी दिनेश गोरवे यांच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या आहे. आरोपी राजू शेंडगे व दिनेश गोरवे यांच्यात पुर्व वैमनस्य असल्याने हा प्राणघातक हल्ला केल्याचे कळते यात अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची वरोरा पोलिसांनी दखल घेऊन तपास सुरू आहे.