बाळाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ जून २०२१

बाळाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

स्पाइनल मस्कुलर  एस्ट्रोपी या दुर्धर आजाराने ग्रस्त बालकासाठी पित्याची आर्त साद 

Appeal for financial help for the treatment of the baby


रामटेक :  स्थानिय रामटेक  निवासी ओमप्रकाश सुरजलाल अहिरकर यांनी आपल्या दोन महिण्याच्या बाळाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

      मिताश ओमप्रकाश अहिरकर असे या दोन महिण्याच्या नर बाळाचे नांव असून याला स्पाइनल मस्कुलर  एस्ट्रोपी (एसएमए टाईप -1 ) हा दुर्धर आजार असून त्याच्यावर नागपुर येथे एम्स व नंतर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.श्वासोच्छवासात त्रास  व इंटरकोस्टल स्नायू  खूपच कमकुवत होत असल्याने  त्याला आक्सिजनवर ठेवण्यांत आले आहे. उपचारासाठी जवळपास १६ कोटीवर खर्च असून हा खर्च करणे आर्थिक परिस्थिती बाहेर आहे. करिता सामाजिक संस्था, इच्छुक दानदात्यांनी जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्यासाठी httos://www.inpactguru.com/fundraiser/help-mitansh यावर क्लिक करावे अशी भावना व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे हा रोग दहा हजार बालकातून एखांद्या  बाळाला होतो। या रोगासाठी  प्रदेशातुन 15 कोटिचे इंजेक्शन लागते।