धक्कादायक:प्रेयसीच्या वाढदिवसाच्या दिवशी जंगलात नेऊन बलात्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०५ जून २०२१

धक्कादायक:प्रेयसीच्या वाढदिवसाच्या दिवशी जंगलात नेऊन बलात्कार

ललित लांजेवार(खबरबात):
चल तुला वाढदिवसाचं गिफ्ट देतो असं सांगून एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत घृणास्पद कृत्य केले.त्यानं तिला शहरालगत असलेल्या कारवा जंगलात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या सर्व कृत्याचा व्हिडीओ बनवला आणि बनावट फेसबुक आयडी बनवून बलात्काराचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. संबंधित घटना ही शुक्रवारी (4 जून) घडली.

फिर्यादीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना ही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात घडली आहे. सन्मुखसिंग बुंदेल या आरोपी तरुणाचे नाव आहे.

आरोपी सन्मुखसिंग पीडित मुलीला सतत जातीवरुन अपमानास्पद,तसेच वाईट बोलायचा. तिच्या मनाविरुद्ध वागण्यामुळे तिने आरोपीला लग्नाला नकार दिला होता. याच नकाराच्या रागात आरोपीने पीडितेवर बळजबरी करत हे कृत्य केलं असल्याचे समजते आहे.


आरोपीने आपले फोटो व व्हिडीओ शेअर केले हे माहीत झाल्यानंतर पीडितेने थेट पोलिसात तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी तपास करत पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या.सोबतच तत्काळ सोशल मीडिया वरून हे व्हिडिओ आणि फोटो हटविण्यात आले. तसेच चे फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले. पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराचा तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.