सीबीएसई बोर्डाच्या बारावी निकालाची 31 जुलैपर्यंत शक्यता : - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जून २०२१

सीबीएसई बोर्डाच्या बारावी निकालाची 31 जुलैपर्यंत शक्यता :

सीबीएसई बोर्डाच्या बारावी निकालाची  31 जुलैपर्यंत शक्यता :   Assessment Criteria

सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. अंतर्गत मुल्यमापन पद्धतीच्या आधारे यावर्षी सीबीएससी बोर्ड निकाल जाहीर करेल असे सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांनाही यंदाच्या 12 वीच्या निकालाच्या नव्या फॉर्म्युलाची उत्सुकता होती. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयामध्ये (SC) सीबीएससी बोर्डाने त्यांच्या निकालाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. 

नव्या फॉर्म्युला नुसार, यंदा सीबीएसईचा 12वीचा निकाल 40:30:30 या फॉर्म्युलावर आहे. त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% असे होईल. 10वी, 11वी चे गुण पाहताना ते 5 पैकी 3 सर्वोत्तम गुणांच्या विषयांचे ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान अ‍ॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांनी कोर्टात माहिती देताना जे विद्यार्थी या फॉर्म्युला नुसार मिळालेल्या मार्क्स ने खुष नसतील त्यांना श्रेणी सुधारण्यासाठी कोविड स्थिती सुधारल्यानंतर होणारी परीक्षा देता येईल.