22 वर्षीय पुरुषाने 13 वर्षाच्या मुलीचा केला विनयभंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ जून २०२१

22 वर्षीय पुरुषाने 13 वर्षाच्या मुलीचा केला विनयभंगभद्रावती शहरातील घटना..

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी ):
भद्रावती शहरातील चंडिकावार्ड येथे राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे
 प्रदीप पत्रू राणे वय 22 वर्ष  राहणार काटोल तुकुम असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी हे बाहेर बसली असता प्रदीप हा मोटर सायकल घेऊन घराजवळ आला व तिला तुझ्याशी काही काम आहे असे म्हणून बाहेर बोलावले व तिचा हात पकडून ओढतान केली या घटनेची माहिती घरच्यांना मिळताच त्याने या घटनेची तक्रार भद्रावती पोलीस दिली आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच पास्को  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.