आर. के. इलेक्ट्रिकल्स दुकानात चोरट्यांनी केली चोरी; 12 हजार 500 रक्कम लंपास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१८ जून २०२१

आर. के. इलेक्ट्रिकल्स दुकानात चोरट्यांनी केली चोरी; 12 हजार 500 रक्कम लंपास
# चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
आनंदवन चौक ते रेल्वे स्टेशन रोड लगत असलेले कल्पना कॉम्प्लेक्स मध्ये राकेश गुप्ता यांचे आर. के. इलेक्ट्रिकल्स चे दुकान असून आज दि. 18 रात्रोला 3 वाजताच्या सुमारास दोन चोरट्याने आर. के. इलेक्ट्रिकल्स दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून काउंटर च्या गल्ल्यात असलेली 12 हजार 500 रोख रक्कम लंपास केली.
पहाटे दुकान उघडण्या साठी आर. के. इलेक्ट्रिकल्स चे संचालक राकेश गुप्ता आले असता त्यांना शटर वाकलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी काउंटरच्या गल्ला बघितला असता व्यापारीला देण्यासाठी 12 हजार 500 रोख ठेऊन असलेली रक्कम लंपास झाल्याचे आढळले. दुकान मालक यांनी त्वरित पोलीस स्टेशन ला जाऊन दुकानाची चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली. यावेळी त्वरित सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरक्षीक सर्वेश बेलसरे व पोलीस शिपाई यांनी सीसी टीव्ही कॅमेरा मध्ये चोरटे कैद झालेल्या फुटेज जप्त केले व पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.