कोरोनामूळे मृत्यु झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत दया, यंग चांदा ब्रिगेडची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ मे २०२१

कोरोनामूळे मृत्यु झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत दया, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

 कोरोनामूळे मृत्यु झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत दया, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोरोनामूळे मृत्यु झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील 58 वर्षीय कंत्राटी कामगाराच्या कुंटुबींयाना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे. यावेळी आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडचे संघटक राम जंगम, राहुल मोहुर्ले आदींची उपस्थिती होती.
मृतक हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मागील 10 वर्षापासून कंत्राटी स्वरुपात विद्युत विभागात इलेकट्रीशियन म्हणून कार्यरत होता. अशातच त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतक हा घरात एकटाच कमवणारा असल्याने आता त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मागील १० महिन्यापासून कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत असल्याने त्यांच्या परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे मृतकाच्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीत सामावून घ्यावे, मागील १० महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरित द्यावे, मृत कंत्राटी कामगाराला कोरोना योद्धा घोषित करून तरतुदींप्रमाणे त्याचा लाभ देण्यात यावा. अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आल्या आहे.