वीज कामगाराचे कामबंद आंदोलन तूर्त स्थगित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३१ मे २०२१

वीज कामगाराचे कामबंद आंदोलन तूर्त स्थगित


ऊर्जासचिव व तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे वीज कामगार याचे कामबंद आदोंलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय


वीज कामगार,अभिंयते सघंटना सयुंक्त कृती समितीच्या वतीने दि.२४ मे २०२१ पासुन वीज कामगार,अभिंयते,अधिकारी व कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दया,वीज कामगार व कुटूंबीय याचे लसीकरण करुन वैघकिय सुविधा उपलब्ध करुन दया. मयत कामगार वारसांना रु.५० लाखाचे अनुदान दया व मेडिक्लेम योजनेत नेमलेला नविन टिपीए रद्द करा,कोविद-१९ चा प्रभाव पाहता वीज बिल वसुली करीता सक्ती करु नये.या मागण्यासाठी कामबंद आदोंलन कोणत्याही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही, झाला तरी तात्काळ पूर्ववत करत तसेच तोफै वादळात विक्रमी वेळेत वीज पुरवठा सुरु करत आदोंलन सुरु ठेवले होते.याबाबत दि.२४.०५.२०२१ रोजी मा.डाॕ.नितिन राऊत यांच्या समवेत चर्चा असफल झाल्यामुळे कामबंद आदोंलन सुरुच होते.वीज कामगारानी राज्यभर विविध पक्षाचे प्रमुख,मंंञी,खासदार,आमदार, विरोधी पक्षनेते याना निवेदने देवुन आपल्या मागण्या व भावना माडल्या. त्यास फार मोठे सर्मथन देत फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळाला पाहिजे ही भुमिका लोकप्रतिनिधी याची होती.
वीज कामगार कामबंद आदोंलना बाबत दि.३१.०५.२०२१ रोजी सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत सल्गंन ३ तास चर्चा कामगार,अभिंयते सघंटना सयुंक्त कृती समितीचे पदाधिकारी व मा.दिनेश वाघमारे ऊर्जासचिव तसेच तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि इतर अधिकारी यांच्या पातळीवर समवेत चर्चा झाली.या चर्चेत सरकारच्या वतीने मा.दिनेश वाघमारे प्रधान ऊर्जा सचिव,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.विजय सिघल (महावितरण),मा.सजंय खंदारे (महानिर्मिती),मा.दिनेश वाघमारे (महापारेषण),मा.पिपळखुटे संचालक (वित्त) विघुत मडंळ सुञधारी कंपनी, मा.मुख्यऔधौगिक सबंध अधिकारी श्री.अनिल मुसळे,श्री.सजंय ढोके, श्री.ललित गायकवाड तर सहा सघंटनाच्या वतीने मा.मोहन शर्मा, मा.कृष्णा भोयर,मा.जयप्रकाश होळीकर,मा.शकंर पहाडे,मा.रवी बारई,मा.आर.टी.देवकांत,मा.केदार रेळेकर,मा.सजंय ठाकुर,मा.सय्यद जहिरोदीन,मा.देवीदास देवकांते, मा.दत्ताञय गुट्टे व मा.संदिप वंजारी हे सहभागी झाले होते.
         मा.दिनेश वाघमारे ऊर्जासचिव यांनी सर्व सघंटना पदाधिकारी याचे बैठकीत स्वागत करुन बैठकीचे प्रास्तविक करण्यास मा.सजंय ढोके मुख्यऔधौगिक संबंध अधिकारी याना सुचना केली व त्यांनी प्रास्तविक कराताना पाच मागण्या बाबत विस्तृत माहिती दिली.सघंटना पदाधिकारी यांनी मा.ऊर्जासचिव याना मागण्या बाबत सरकार व प्रशासन याची भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. *मा.दिनेश वाघमारे* साहेब यांनी पूर्वी मा.ऊर्जामंञी यांच्या पातळीवर जी बैठक झाली होती तिच भुमिका परत माडंली व कामगार सघंटना पदाधिकारी याना बोलण्याची सुचना केली.सघंटनेचे पदाधिकारी मा.सय्यद जरियोदिन,मा.दत्ताञय गुट्टे,मा.आर. टी.देवकांत,मा.शकंर पहाडे,मा.सजंय ठाकुर,मा.मोहन शर्मा,मा.कृष्णा भोयर,मा.देवीदास देवकाते व जयप्रकाश होळीकर यांनी विस्तृत पणे मागण्यावर आपली भुमिका माडूंन ठोस निर्णय झाल्याशिवाय आदोंलन परत घेता येणार नाही ही भुमिका स्पष्ट केली.मा.ऊर्जासचिव यांनी महावितरण कंपनीचे अध्यक्ष *मा.विजय सिंघल* याना बोलण्याची सुचना केली ते म्हाणाले कामगार यांच्या मागण्या योग्य आहेत. महावितरण कंपनीने त्याच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा व लसीकरण करणबाबत जे प्रयत्न केले याबाबत माहिती दिली.तसेच विज बिल वसुली करीता सक्ती करणार नाही माञ वीज बिल वसुली झाली नाही तर कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक खराब होईल हेही स्पष्ट केले.टिपीए बाबतचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यावा असे सुचित केले. *मा.सजंय खंदारे* अध्यक्ष महानिर्मिती कंपनी यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या हया योग्य आहेत.सरकारला पूर्ण करताना काही अडचणी येत आहे.माञ सकारात्मक विचार दोन्ही बाजुने व्हावे.महानिर्मिती कंपनीत सदया ७५०० कामगार याचे लसीकरण पूर्ण झाले असुन शिल्लक कामगार याचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल हे स्पष्ट केले.सदयाची परिस्थिती खराब असल्यामुळे कामबंद आदोंलन सुरु राहणे हे प्रशासन व सघंटना यांच्या दृष्टीने बरोबर नाही.लसीकरण करण्यासाठी व योग्य उपचार करण्यासाठी कंपनीचे प्रशासन शक्य ते प्रयत्न करत आहे.टिपीए बाबत चर्चा करुन शासनाचे मार्ग काढावा.
          ओरियट इन्सुरन्स कंपनीच्या प्रमुख श्रीमंती सुनिता भुसेवार यांनी सुध्दा विस्तृत भुमिका पाॕलीसी बाबत माडंली व चांगली सेवा देणार हेही स्पष्ट केले.
             *मा.दिनेश वाघमारे* ऊर्जासचिव व व्यवस्थापकीय संचालक महापारेषण कंपनी यांनी मागण्या बाबत खालील खुलाशा केला.


१) फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे:- ही आपली मागणी योग्य आहे.माञ केंद्र सरकारने असा कोणत्याही दर्जा देता येणार नाही असा निर्णय घेतलेला आहे.असे असताना ऊर्जा विभागाने मदत,पूर्णवसन विभाग व आरोग्य विभागास फ्रंटलाईन वर्करचा दर्जा वीज कामगार याना दयावा असा प्रस्ताव दिलेला असता अतिरिक्त मुख्यसचिव मा.प्रदिप व्यास व मा.असिम गुप्ता सचिव पूर्णवसन यांनी प्रस्ताव मान्य केला नाही.परत शासनास ऊर्जा विभागाकडून नविन प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात येईल.मा.ऊर्जामंञी महोदय सुध्दा शासन स्तरावर पाठपुरावा करेल.


२) वीज कामगार व कुटूंबीय याचे लसीकरण करणे :- सदया ४२% कामगार याचे लसीकरण झाले असुन ३२ जिल्हाधिकारी यांनी फ्रंटलाईन वर्कर समझुन लसीकरण करण्याचे लेखी प्रञ आरोग्य विभागास दिलेले आहे.शिल्लक कामगार व कुटूंबीय याचे लसीकरण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्या सोबतच आरोग्य विभागाची परवानगी घेवुन लस खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येईल हेही स्पष्ट करण्यात आले.


३) कोविद-१९ मुळे मुत्यु पावलेल्या कामगार,अभिंयते,अधिकारी व कंञाटी कामगार याना रु.५० लाखाचे अनुदान मिळणेबाबत.:- राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यां प्रमाणे रु.५० लाखाचे अनुदान देणेबाबत प्रस्ताव राज्य सरकारला पाठवुन मान्यता घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

४) मेडिक्लेम पाॕलीसीत कामगार सघंटनाना विश्वासात न घेता परस्पर टिपीए बदलेला तो निर्णय रद्द  करणेबाबत.:- याबाबत सुञधारी कंपनीचे संचालक (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती सहा सघंटना पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करुन चार दिवसात ऊर्जासचिव याना अहवाल सादर करेल व मा.ऊर्जामंञी याना अहवाल सादर करुन चार दिवसात निर्णय घेण्यात येईल.


५) कोविद-१९ आजारा पाहता व लाॕकडाऊन असल्यामुळे वीज कामगार याना वीज बिल वसुली करीता सक्ती करण्यात येवु नये:- याबाबत सक्ती करण्यात येणार नाही.माञ वसुली करणे गरजेचे आहे.हेही त्यांनी स्पष्ट केले.


             वरील सर्व प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे व लेखी स्वरुपात सरकार व व्यवस्थापना कडून कार्यवृत्त देण्यात येणार असल्यामुळे कामबंद आदोंलन तृर्त स्थगित करण्याचा निर्णय कृती समितीने निर्णय घेतला असुन लवकरच सकारात्मक तोडगा निघाला नाही तर सामुदायिक रजा आदोंलन करणार असल्याचा इशारा एका लेखी प्रञाव्दारे शासन व प्रशासनास कृती समितीने दिलेला आहे.