तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ मे २०२१

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
तालुक्यातील घोट निंबाळा येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज पहाटे आठ वाजता घडली.

रजनी भालेराव चिकराम वय 35 राहणार घोट  असे या महिलेचे नाव आहे .  ही महिला आपल्या सहकार्या सोबत तेंदुपत्ता संकलनात साठी आयुध निर्माणी जंगल शिवारात गेली असता त्या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलेवर हल्ला केला यात एकच गोंधळ उडाल्याने  महिलांची पळापळ सुटली त्यात रजनी  वाघाच्या हल्ल्यात घटनास्थळी ठार झाली या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना मिळताच  क्षेत्र सहायक एन वि हनुवते यांच्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले .या घटनेमुळे तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जाणाऱ्यांन मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.