आंबादेवी वॉर्डच्या गेटसमोर हवेत गोळीबार; चाकूने वार करून व्यावसायिकाला केले ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ मे २०२१

आंबादेवी वॉर्डच्या गेटसमोर हवेत गोळीबार; चाकूने वार करून व्यावसायिकाला केले ठार

आंबादेवी वॉर्डच्या गेटसमोर हवेत गोळीबार; चाकूने वार करून व्यावसायिकाला केले ठार


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा येथे आझाद वार्डातील व्यावसायिक शेख आबिद शेख (३२) यांची आंबादेवी गेट सामोर महादेव मंदीराजवळ चाकूने हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारी घडली. 


सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी शेख आबिद शेख याला चाकूने  हत्या करून हवेत गोळ्या झाडून बंदूक मृतकवर सोडून व चाकू सोडून आरोपी  घटनास्थळावरून पसार झाले. मृत शेख आबिद शेक हा बकरी व कोंबडी पालनचा व्यवसाय करायचा, याचबरोबर सट्टा व जुगाराचा धंदा देखील धंदा होता. हल्लेखोरांनी आबिदच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांने वार केले होते.


उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. तसेच, आबिदची हत्या कोणत्या कारणाने झाली याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.