१५ मे २०२१
नागपूर /अरूण कराळे ( खबरबात )
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉक डाऊनमुळे वाडीतील सर्व मार्केट बंद आहेत.रमजान ईदच्या दिवशी पोलीसांचा बंदोबस्त तगडा असतानाही वाडी शहरात विदेशी दारूची विक्री करताना वाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार पूर्वा हाइट्स बिल्डिंग खडगाव रोडच्या पार्किंगमध्ये शुक्रवार १४ मे दुपारी २ वाजताच्या दरम्यान आरोपी आकाश भोयर अवैध दारू विकत असल्याची गुप्त माहिती वाडी पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अविनाश जायभाये आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन आरोपी आकाश भोयरला दारू विकताना रंगेहात पकडले. अंदाजे १५ हजार ५१० रुपयांची विदेशी दारू व एक्टिवा मोपेड क्रमांक एम. एच. ४० एएस १८७९ किंमत अंदाजे ३० हजार असा एकूण ४५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमालासह आरोपीस अटक करून दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाडीचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी माहिती दिली.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश जायभाये , पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे,कऱ्हाडे, शिपाई रवींद्र सतोकर,नंदू रंडखे करीत आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
