पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरचंद्रपूर दि. 6 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दि. 7 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.


शुक्रवार, दिनांक 7 मे, 2021 रोजी सकाळी 08.30 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून वरोरा, जि. चंद्रपूर कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वरोरा, जि. चंद्रपूर येथे आगमन व खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे सदिच्छाभेट घेतील. सकाळी 10.15 वाजत वरोरा येथील कोव्हीड सेंटरला भेट देतील त्यानंतर सकाळी 10.30 वाजता उपविभागीय कार्यालय, वरोरा येथे कोव्हीड आढावा बैठक घेतील.


सकाळी 11.15 वाजता वरोरा येथून भद्रावती, जि. चंद्रपूर कडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता भद्रावती येथे आगमन व शिंदे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल भद्रावती येथील कोव्हीड सेंटरला भेट देतील. दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालय, भद्रावती  येथे कोव्हीड आढावा बैठक घेतील. दुपारी 12.30 वाजता  भद्रावती येथून चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहनार आहे. दुपारी 1.30 वाजता विसकलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोव्हीड आढावा बैठक घेतील.


दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथून राजूरा कडे प्रयाण. दुपारी 03.30 वाजता शासकीय विश्रामगृह राजूरा, जि. चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायं.4 वाजता राजूरा, येथील कोव्हीड सेंटरला भेट देतील त्यानंतर सायं.4.15 वाजता उपविभागीय कार्यालय, राजूरा येथे कोव्हीड आढावा बैठक घेतील. साय.4.45 वाजता राजूरा येथून बल्लारपूर, जि. चंद्रपूर कडे प्रयाण.  सायं. 5 वाजता बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे आगमन व कोव्हीड सेंटरला भेट देतील, त्यानंतर  सायं. 5.15 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथे कोव्हीड आढावा बैठक घेतील. सायं. 5.45 वाजता बल्लारपूर जि. चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण, रात्री  8.30 वाजता कमलाई निवास, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहणार आहे.