नागपुरात ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'सेवा सुरु झाल्याचे समाधान - डॉ.नितीन राऊत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ मे २०२१

नागपुरात ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'सेवा सुरु झाल्याचे समाधान - डॉ.नितीन राऊत

नागपुरात ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन

'सेवा सुरु झाल्याचे समाधान - डॉ.नितीन राऊत
नागपूर दि. १४ : मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांचे सूचनेनुसार नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ला सुरुवात केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केले. 

बेडची उपलब्धताऑक्सिजन बेडव्हेंटिलेटर बेड यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा करणारा नागपूर जिल्हा या उपक्रमातही अग्रेसर असून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू केल्याबद्दल डॉ.नितीन राऊत यांनी मनपाचे कौतुक केले.

आज नागपूर शहरातील बैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये त्यांनी साठ वर्षांवरील जेष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाहनात आलेल्या श्यामदास छाबराणी (८३ वर्ष )कृष्णा छाबराणी (६२ वर्ष ) या ज्येष्ठांचे लसीकरण केल्यानंतर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. छाबराणी परिवाराशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारीआमदार अभिजित वंजारीनागपूर महानगरपालिकेचे आयुक्त  राधाकृष्णन बी,स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर,मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवेधंतोली विभागाच्या सभापती वंदना भगतमहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशीसहाय्यक आयुक्त किरण बगडेयांच्यासह अन्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या नेतृत्वातील आरोग्य पथक उपस्थित होते. 

आज सकाळी ग्लोकल स्क्वेअर मॉल या ठिकाणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'चे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवसभरात हा अशा पद्धतीच्या लसीकरणाचा दुसरा कार्यक्रम आहे.

नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाहीजे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत. किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा 60 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते. या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे जेष्ठ नागरिक स्वतःचे वाहनदुचाकी चालवू शकतातत्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहेतथापि ही सुविधा केवळ 60 वर्षावरील असाह्य ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

     पालकमंत्र्यांनी यावेळी काही नागरिकांचे लसीकरण होईपर्यंत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट केले. सध्या नागपूर शहरांमध्ये बेड,ऑक्सिजन,रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने लढली जात आहे. पुढील काळातील नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून दर चार तासाने प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काळात ही लाट नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधाचे पालन करावे. गरज नसेल तर घराबाहेर निघूच नये. लसीकरण पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडणे आपल्या सोबत इतरांना धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होणे आवश्यक असून शंभर टक्के लसीकरण हे सध्या एकमेव उद्दिष्ट आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावेनागपूर शहरातील तरुणांनी या दोन केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आणण्यात मदत करावीस्वयंसेवी संस्थांनी मदत करावीअसेही आवाहन डॉ.राऊत यांनी केले.