Top News

अभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची केली उधळण Tiger Paradise Resort

अभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची केली उधळण file Photo दी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अॅण्ड वॉटर पार्कमध्ये सहा तरुणींना ...

ads

बुधवार, मे २६, २०२१

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतर्फे दत्तक गावांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप
आवाळपूर :-
परिसरातील गावात कोरोनाने थैमान घातले आहे. याच धर्तीवर सामजिक भान जपत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ने दत्तक गावांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप करण्यात आले.

अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड विजय एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील दत्तक गावातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने नेहमी प्रमाणे या वेळेस ही पुढाकार घेत कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप केले. आवारपूर, नांदा, नोकरी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयेगाव, हिरापूर व सांगोळा अशा बारा गावात मास्क, सानीटाँयझर, आँक्सीमीटर, गन थर्मामीटर, डेटॉल साबण, सोडियम क्लोराइड व कापूर ओवा पोतली हया साहित्याचे वाटप करण्यात आलेे.

नजीकच्या हिरापूर गावातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. गावकऱ्यांचा मागणीला दाद देत सी एस आर निधी अंतर्गत सर्व मागण्या पुर्ण करण्यात आल्या. येथील स्वयंसेवकासाठी कोरोना सुरक्षा किट वाटप करून जिल्हा परिषद शाळेत कंपनीद्वारे सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी टँकर द्वारे करण्यात आली. तसेच सर्व कोविड प्रतिबंधक साहित्य सुद्धा वेळेवरती गावात देण्यात आले.
सतिष मिश्रा, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यानी गावा-गावात साहित्य पोहचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

हिरापूर गावचे सरपंच उपसरपंच यांनी अल्ट्राटेक कंपनी चे विशेष आभार मानले. तर इतर गावातील सरपंच व उपसरंच यांनी सुुुध्दा कंपनी  प्रशासनाचे आभार मानले.

- आम्ही गावाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहू. 

अल्ट्राटेक कंपनी प्रबंधक संजय शर्मा व कर्नल दिपक डे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.