झोन सभापती स्व. अंकुश सावसाकडे यांना मनपातर्फे श्रद्धांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ मे २०२१

झोन सभापती स्व. अंकुश सावसाकडे यांना मनपातर्फे श्रद्धांजली

 झोन सभापती स्व. अंकुश सावसाकडे यांना मनपातर्फे श्रद्धांजली
चंद्रपूर, ता. ४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन क्र. तीनचे सभापती अंकुश सावसाकडे यांचे सोमवारी (ता. ३) निधन झाले. यानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील राणी हिराई सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, भाजपचे गटनेते वसंत देशमुख, नगरसेवक प्रदीप किरमे, उपायुक्त विशाल वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे आदी उपस्थित होते.

स्व. अंकुश सावसाकडे हे प्रभाग ३ एमईएल (ब)चे नगरसेवक होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची झोन तीनच्या सभापतीपदी निवड झाली होती. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यान त्यांची  प्राणज्योत मालावली. इंदिरानगर भागातील जनतेच्या सेवेत ते सदैव असायचे. त्यामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात आपुलकी होती, अशा भावना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनी स्व. अंकुश सावसाकडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या निधनाबद्दल महानगरपालिकेच्या वतीने दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.